कवठेमंकाळ नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 10 जागावर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
सुधीर पाटील-सांगली
अख्ख्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी तब्बल10 जागा जिंकत विरोधी भारतीय जनता पार्टीचे खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आणि जिल्हा बँकेच्या संचालिका श्रीमती अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला. अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीला 10 शेतकरी विकास आघाडी ला 5 तर दोन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमंकाळ शहरामध्ये गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. शेतकरी विकास आघाडी मधील विद्यमान नगरसेवक गजानन कोठावळे, बाळासाहेब पाटील आणि पॅनलचे नेते पांडुरंग पाटील यांच्या पत्नी आधी दिग्गज उमेदवारांचा धक्कादायक रित्या पराभव झाला.