गारमाळच्या 2000 फूट दरीत आढळला इसमाचा मृतदेह....
अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढला बाहेर
दत्ता-शेडगे-खालापूर
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या गारमालच्या जंगलात खोल दरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वारावरण पसरले आहे,
रायगड जिल्ह्याचे शेवटचे असलेल्या गारमाळच्या घनदाट जंगलात 2000 फूट खोल दरीत एका इसमाचा मृतदेह कामगारांना दिसून आला त्यांनी ग्रामस्थांना कळविले असता ग्रामस्थांनी खालापूर पोलीस यांना कळविले असते त्यांनी पोलिस,अपघातग्रस्तांच्या मदतीला टीम आणि सहज सेवा टीम, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यशवंती हॅकर्स, टीम आणि खोपोली अग्निशमन दल यांनी खोल दरीमध्ये उतरून दोरीच्या साहाय्याने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर हा मृतदेह बाहेर काढण्यात या सर्व टीमला यश आलं.
हा माथेफिरू असून हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले असून खालापूर पोलीस, अपघातग्रस्त,टीम सहज सेवा टीम, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, यशवंती हॅकर्स, आणि स्थानिक ग्रामस्थ , यांच्या अथक प्रयत्ननि हा मृतदेह दोरीच्या साहाय्याने काढण्यात या सर्व टीमला यश आले.2000 फूट खोल दरीत उतरून हा मृतदेह काढण्यात अथक प्रयत्न करणाऱ्या या टीमचे मात्र सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.