कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आमदार महेंद्र थोरवे यांनी केले 25 बेडचे आणि ब्लड स्टोअरेज केंद्राचे उद्घाटन
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 25 सुसज्ज बेड आणि ब्लड स्टोअरेज केंद्राचे उद्घाटन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. तर लवकर ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करणार असल्याची माहिती देऊन आमदार थोरवे यांनी सांगितले की,लवकरच रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करणार असून आतापर्यंत कोव्हीड उपाययोजनेसाठी आमदार निधीतून दीड कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळीआरोग्य उपसंचालक गौरी कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने,कर्जत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ.बनसोडे ,कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,नगरसेवक संकेत भासे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार थोरवे पुढे म्हणाले, सगळीकडे कोव्हीड महामारी चे संकट असताना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोय सटाणा त्यावेळी फक्त पाच बेड उपलब्ध होते आता आपण 75 बेड उपलब्ध झाले आहेत,कोव्हीड महामारीच्या उपाययोजना करून आरोग्य यंत्रणा सक्षम केली असून लसीकरण 95 टक्के झाले असून शासन आणि प्रशासन एकत्र येऊन काम करत असल्याचे थोरवे यांनी सांगितले.