पाटण नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का: गृहराज्यमंत्र्यांना केवळ 2 जागा
मिलिंद लोहार -सातारा
पाटण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवले आहे. मात्र शिवसेनेने विजय खाते खोलले आहे.
सत्ताधारी पाटणकर गटाने पहिल्या 12 प्रभागात विजयी सलामी दिली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आस्मा सादिक इनामदार यांनी 202 मते मिळवून विजय संपादन केला आहे तर शबाना इम्रान मुकादम यांना 167 मते मिळाली आहेत. याच मित्राबरोबर हिराबाई मारुती कदम आणि श्रद्धा संजय कवर यांचाही या ठिकाणी पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शैलजा मिलिंद पाटील यांनी 202 मते मिळवून विजय मिळवला तर वैशाली सुनिल पवार आणि अश्विनी प्रदीप शेलार यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे. पाटण नगर पंचायत मध्ये 15 जागा वरती राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाला व शिवसेना पक्षाला या ठिकाणी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.