Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळा नगर पंचायत निवडणूक 4 जागांसाठी सरळ लढतीत 69.49% मतदान',उद्या होणार 16 प्रभागातील उमेदवारांचे निकाल.

 

म्हसळा नगर पंचायत निवडणूक 4 जागांसाठी सरळ लढतीत 69.49% मतदान',उद्या होणार 16 प्रभागातील उमेदवारांचे निकाल.

महाराष्ट्र मिरर टीम-म्हसळा 

ओबीसींच्या 4 आरक्षित जागांना स्थगिती मिळाली असता त्या ठिकाणी सर्वसाधारण जागेवर सरळ लढतीत 18 जानेवारी रोजी मतदान प्रकिया संपन्न झाली असता 69.49%मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.चार जागांसाठी राष्ट्रवादीचे 4,काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेच्या एका उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीचे दिवेकर संजय यशवंत यांचे विरोधातशिवसेनेचे बनकर प्रविण विनोद यांची लढत झाली आहे.प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बशारत फरहीन अब्दुल अझीझ यांचे विरोधात काँग्रेसच्या पेणकर हिबा अब्दुल यांचेत लढत झाली आहे.प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदानी सुमय्या कासम यांचे विरोधात काँग्रेसच्या खतीब मुहेर माजिद यांच्यात थेट लढत झाली आहे,प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादीचे उकये अब्दुल रहीम शाहिद यांचे विरोधात डॉ.शेख अ.मुविज अ.अजीज यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे.चार प्रभागात संपन्न झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 418 मतदार आहेत पैकी 312 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्या मध्ये स्त्री मतदार 172,पुरुष मतदार 140 आहेत.प्रभाग क्रमांक - 7  मध्ये

एकूण मतदार - 286 आसुन स्त्री मतदार 90 तर पुरुष मतदार 96 मिळुन एकूण 186 मतदारांनी मतदान केले आहे.प्रभाग क्रमांक - 8 मध्ये एकूण मतदार - 400 मतदार आसुन स्त्री मतदार 90 आणि पुरुष मतदार 129 मिळुन

एकूण 265 मतदारांनी मतदान केले आहे.प्रभाग क्रमांक - 9 मध्ये एकूण मतदार - 407 आहेत या मध्ये स्त्री मतदार 159 आणि पुरुष मतदार 128 मिळुन एकूण 287 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.आज दिनांक 19 रोजी म्हसळा नगर पंचायतीच्या 16 जागांसाठी 41 उमेदवारांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies