सोलनपाडा धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता
आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना यश
दिनेश हरपुडे/ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम
2014 साली या धरणाचा बांध फुटल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झालं होतं.तत्कालीन पाटबंधारे मंत्री यांनी या धरणाचे काम केले त्यांनतर काही वर्षांत या धरणाच्या सांडव्यातून पाणी गळती होऊ लागलं आणि माती काम दबले शिवाय या परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने या परिसरातील लोकांना पुन्हा संकटाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी इथल्या जनतेची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि जलसंधारण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून या धरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या परिसरातील नागरिकांनी आमदार थोरवे यांचे आभार मानले आहेत.