बंदी उठवल्यानंतरच्या नांगोळेच्या पहिल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलजोडीस पहिला क्रमांक
उमेश पाटील-सांगली
राज्यातील संपूर्ण बैलगाडी शौकीनच्या नजरा लागून राहिलेल्या नांगोळे येथे भरवलेल्या पहिल्या बैलगाडी शर्यतिमध्ये कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलजोडीने पहिले बक्षीस मिळवले. आणि बैलगाडी शौकीनाच्या डोळ्याचे पारणें फिटले.
बैलगाडी शर्यतीचा पहिलाच मान मिळालेल्या नांगोळे (ता.कवठेमहांकाळ) येथील बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. स्पर्धेतील बैलगाडी मालक संदीप पाटील यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिले. अत्यंत उत्कंठापूर्वक बनलेल्या बैलगाडी शर्यती पोलीस व महसूल प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पार पडल्या. शिवसेनेचे संदीप गिड्डे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या.
नांगोळे येथील शिवसेनेचे संदीप गिड्डे पाटील यांनी वाढदिवसानिमित्त राज्यातील पहिलीच बैलगाडी शर्यतीचे मैदान २५ डिसेंबर रोजी आयोजित केले होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ही शर्यत ०४ जानेवारी रोजी झाल्या.शर्यतीस सांगली जिल्हाधिका यांनी नियम व अटी घालून परवानगी दिली होती.
शर्यतीचा मान गावाला मिळाल्याबद्दल गावात गुढया उभा करून बैलगाडी शर्यतीत आलेल्या बैलगाडी मालकाचे स्वागत केले. ग्रामपंचायतीनेही गुढी उभारली होती. शर्यतीस दुपारी तीनला सुरूवात झाली.नांगोळे येथील शर्यती मैदानावर पोलिस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले,पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त होता.
शर्यती सोडण्यापूर्वी महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत बैलजोडी व बैलगाडीमालक यांची तपासणी केली.बैलगाडी शर्यती महसूल, पोलीस व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडल्या.
शर्यती आदत, ब बैलगाडी गटात दोन शर्यती आणि अ गट जनरल अशा शर्यती झाल्या.निकाल खालीलप्रमाणे - अ गट जनरल प्रथम संदीप पाटील (कोल्हापूर), द्वितीय अवि माने (डफळापुर), तृतीय बाळू नाईक (कलोती), ब पहिला गट प्रथम सतीश उपाध्ये (बेंद्री) द्वितीय बाळू खामकर (अलकुड (एस),तृतीय अक्षय भोसले (काननवाडी), ब दुसरा गट प्रथम बाळू डोंगरे (मिरज),राजू पाटील (कोंगनोळी) तृतीय ज्ञानू देवकाते (खलाटी)आणि आदत गटात प्रथम सचिन सरवदे (जाखापुर), द्वितीय श्रीकांत हजारे (कुकटोळी), तृतीय संतोष गलांडे (अंकले) यांनी बक्षीस पटकावले.
शर्यतीसाठी शिवसेनेचे संजय विभुते,शंभूराजे काटकर,संदीप गिड्डे- पाटील,दादासाहेब कोळेकर,संजय हजारे,विकास हाक्के,भगवान वाघमारे,मारुती पवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. शर्यती शौकिनांची उपस्थिती होती.
राज्यामध्ये गेली अनेक वर्षे बैलगाडी शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठया होणाऱ्या बैलगाडी शर्यती बंद पडल्या होत्या. तसेच बैलगाडी शर्यती बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शर्यतीमध्ये धावणारे बैल तयार करण्यासाठी बळीराजा या बैलांवर लाखो रुपये खर्च करत होता आणि हेच बैल शर्यतीसाठी पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत विकले जायचे. बळीराजाच्या सर्जा राजाला शर्यतीसाठी फार मोठी मागणी असायची. परंतु मधल्या काही काळामध्ये शर्यतीच बंद झाल्याने बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर दिसेनासा झाला होता.
बैलगाडी शर्यतस परवानगी मिळावी म्हणून राज्यातील सर्वच पक्षांनी न्यायालयीन लढाई करून ही लढाई जिंकली आणि सुप्रीम कोर्टाने नियम आणि अटी घालून बैलगाडी शर्यतिवरील बंदी उठवली.