अखेर दोन वर्षानंतर अमित सिंगचा मारेकरी सापडला
रोहा पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
सागर जैन-रोहा
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे 28 जानेवारी 20 20 रोजी रोहा येथील राहत्या घरातून बेपत्ता झालेला अमित उमाशंकर सिंग यांची मिसिंग नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती .अमित सिंग यांचा खून झाला असल्याचं रोहा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
पोलीस अधिक तपास करीत असताना दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी गेली दोन वर्षे नंतर विकास चव्हाण हा रोह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता विकास चव्हाण यांनी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
अमित सिंग यांच्याकडे नोकरी करणारा विकास महादेव चव्हाण याने अमित सिंग यांच्या मोटारसायकल वरून रोहा नागोठणे भिसे खिंड असा प्रवास करत असताना अमित सिंग लघुशंका करण्यासाठी थांबले असता विकास चव्हाण यांनी दगडाने अमित सिंग यांच्या डोक्यात दोनदा प्रहार करून जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत टाकून दिला.अशी गुन्ह्याची कबुली विकास चव्हाण याने पोलिसांना दिली आहे.आरोपी विकास चव्हाण याला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील रोहा पोलीस स्टेशन करत आहेत.