खुषखबर !
आता पेण, कासू, नागोठणे , रोहयामध्ये थांबणार दिवा - रत्नागिरी -दिवा एक्स्प्रेस.....वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश
विनोद भोईर-पाली,सुधागड
भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नाने पेण येथे दिवा रत्नागिरी एक्सप्रेस रेल्वे ला पुन्हा एकदा थांबा मिळाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पेण रेल्वे स्थानकात कोरोना पुर्वी दिवा - रत्नागिरी गाडीला थांबा होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरची गाडीला पेण स्थानकात थांबा देण्यात आला नव्हता. त्यामुळे पेण वरून पनवेल, दिवा, व मुंबईकडे तसेच पेण वरून महाड, चिपळूण, रत्नागिरी येथे जाण्याकरिता रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तसेच एसटी व खाजगी गाड्यांनी प्रवास केल्याने या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.
पेण रेल्वे स्थानकात जलदगती रेल्वेगाडीला थांबा मिळावा यासाठी पेण येथील रेल्वेप्रवाशां बरोबरच रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. वैकुंठ पाटील यांनी याबाबत 3 महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची मुंबई येथील रेल्वे मुख्यालयात भेट घेऊन चर्चा करुन त्यांना पेण येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी आवाहन केलं.
पेण रेल्वे स्थानकात जलदगती रेल्वेगाडीला थांबा मिळावा यासाठी पेण येथील रेल्वेप्रवाशां बरोबरच रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. वैकुंठ पाटील यांनी याबाबत 3 महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची मुंबई येथील रेल्वे मुख्यालयात भेट घेऊन चर्चा करुन त्यांना पेण येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोचविल्या. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यात करिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले होते.
त्यानुसार 15 जानेवारी पासून दिवा रत्नागिरी दिवा ही जलदगती रेल्वे गाडी पेण, कासु व नागोठणे बरोबरच रोहा येथील स्थानकात थांबणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.