माथेरान नगरपालिकेवर मुख्याधिकारी कारभारी
संजय गायकवाड-कर्जत
धोरणात्मक निर्णय घेणे शहरातील विकास कामे सुरु ठेवणे आदी अधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत. खालापुर नगरपंचायती मध्ये काम करत असताना त्यांना तिथल्या कामाचा चांगला अनुभव आहे, शहराचा विकास कसा गतिमान होईल या विषयी त्यांच्या मनात खूप चांगल्या कल्पना व नियोजन आहे.
माथेरान पर्यटन स्थळी कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये या करता त्यांनी विशेष प्रयत्न केले. ठिक ठिकाणी बॅनर्स लावून कोरोना बाबत जनजागृती केली. तसेच येण्यारा पर्यंटकांचे दोन ङोस घेतल्याची खातरजमा करून माथेरान मध्ये प्रवेश दिला तसेच दसतुरीवर नाक्यावर ऑसिजन लेवल तसेच थरमल स्कॅनिंग नगरपालिकेमार्फत केले जात आहे.
नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या बरोबर स्वतः मुख्याधिकारी सुरेखा भणगे रस्त्यावर उतरून पर्यंटकांना मास्क लावण्या सुचना करत होत्या तसेच कोरोना बाबत प्रबोधन ही करताना मुख्याधिकारी दिसत होत्या अशी एक ना अनेक कामे त्यांनी माथेरान येथील पदभार हाती घेतल्यावर मार्गी लावली आहेत.