माझा पुरस्कार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण : महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर यांचा नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गौरव !
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची महापौरांकडे मागणी
पत्रकारांची नोंदणी करण्यासाठी शीतल करदेकर यांचा आग्रह
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्रच्या धडाकेबाज अध्यक्षा शीतल करदेकर यांनी महापौरांच्या कार्याचा गौरव करुन पत्रकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, त्यांची सरकार दरबारी योग्य नोंदणी करण्यात यावी, सन्मानाने सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी काय करता येईल ते पहावे, अशी आग्रही भूमिका मांडली.सांस्कृतिक सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले व अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी ही पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.