श्रीवर्धन जीवना बंदर येथील लक्ष्मी विजय नौकेला जलसमाधी, चार खलाशी बचावले
लाखो रुपयांचे नुकसान
डॉ.विजय गिरी-श्रीवर्धन
गेल्या वर्षी प्रमाणे ह्याही वर्ष समद्रामध्ये होत असलेल्या छोट्या मोठ्या वादळामुळे मच्छीमारी ही धोक्यात आली असून. एक तर दररोज होत असलेला डिझेल, बर्फ, ऑईल, रेशनिग इत्यादी प्रत्येक फेरिचा खर्च निघत नाही. कारण मच्छिमारांना पुरेसे मासेमिळत नसल्याने मच्छीमारी हि आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच हे समुद्रात होणारे वादळे .
तशाच प्रकारे रविवार रोजी दुपार नंतर अचानक समुद्रात मध्ये दक्षिणेकडील सोसायट्यांच्या वादळ वारे वाहयला सुर्वात झाले. त्यामुळे मच्छीमार हे भयभीत होऊन आपआपल्या नौका व जीव मुठीत धरून नौका मुळगाव येथील खांडी मध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असतांना वार्याच्या प्रचंड वेग व समुद्राचे घेतलेल्या रौद्र रूप धारण पुढे मच्छीमारी हे हतबल झाले. त्यांमध्येच अनिकेत लक्ष्मण रघुविर लक्ष्मी विजय नौकांचे सुकान तुटल्याने नौका भरकटली व दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरिबंदर टोकाजव जळसमाधी मिळाली . त्या नौकेमधील असले बाळकृष्ण रघुविर, जयेश रघुविर, गणेश कुलाबकर हे समुद्राच्या पाण्यानी झुंज देत बालंबाल बचावले. मात्र अनिकेत रघुविर , नौका लक्ष्मी विजय यांची नौका व जाळी, पकडून सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तरि सरकारने सहकार्य करावे अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमारी कडून केली जात आहे