नेरळ परिसर मुले चोरणाऱ्या टोळीमुळे दहशतीत
एका मुलाला चोरणारी महिला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत परिसरातील काही भागात लहान मुले आणि मुली यांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. मागील पंधरवड्यात कर्जत येथील तीन दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनी गायब झाल्या होत्या पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्या नागपूर येथे सुखरूपपणे सापडल्या . मागील आठवड्यात नेरळ परिसरात अशा चोरी करणाऱ्या पुरुषांना अटक करण्यात आली होती. आज निर्माण नगरी येथील सोसायटी मध्ये पुणी पारकर नामक महीलेच्या मुलाला खेळत असताना हाताला धरून ओढून पळवून नेत असताना सोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.मुलांनी केलेल्या आवाजामुळे इतर लोक जमा झाल्याने त सदर चोर महिलेने तिथून धूम ठोकली. परंतु नेरळ मध्ये ही महिला कुठेतरी लपली असेल या संशयात असताना नेरळ येथील रेल्वे स्टेशन बाकड्या खाली ती लपली असल्याचे लोकांना कळाले , गुन्हा हा नेरळ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडल्याने रेल्वेच्या होमगार्ड आणि जीआरपी सदर महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिल .पोलिसांनी सदर महिलेला अटक केली आहे.त्यानुसार ताबडतोब पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेत पुढील चौकशी साठी पोलिस ठाणे येथे नेले. पुढील तपास ASD डी के म्हात्रे हे नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.आज सदर महिलेला कर्जत कोर्टात हजर केले असता तिला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.