पालीत अवैध धंद्याना चाप!
माफियानी पो.नी विश्वजित काईंगडेंचा घेतला धसका
विनोद भोईर-पाली-सुधागड
मात्र डिसेंबर महिन्यांत पाली पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदी खालापूर येथून बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी पाली पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतल्या नंतर त्यांनी पाली शहरासह तालुक्यातील मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, चक्री, व्हीडीओ गेम, गावठी दारू इत्यादी अवैध धंद्यावर छापे मारी (धाडसत्र) सुरु केले. अवैध धंदे चालविणारे याच्यासह तेथे, खेळणाऱ्या जुगा-यांना देखील त्यांनी सलो की पलो करून सोडल्याने अवैध धंदे वाल्यांनी पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांचा चांगलाच धसका घेतला असून आज मितिस पाली शहरातील सर्व मटके, पत्ते जुगार , ऑनलाईन लॉटरी, चक्री इत्यादी अवैध धंदे बंद असल्याचे दिसून येते आहे.पोलीसाच्या या धाडसत्राचे सर्वत्र कौतुक होत असून पाली शहरासह तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद राहीले तर अनेक कुटूंबांची संसारे उध्वस्त होण्यापासून वाचतील. असे. जनमानसातून बोलले जात आहे.