कुसूंबळे सरपंच त्रिवेणी पाटील यांच्यासाहित असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघात शेकापला हादरा
अमूलकुमार जैन-अलिबाग
कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच त्रिवेणी पाटील व युवा नेते नवनाथ पाटील, तनुजा पाटील यांच्यासह कुसुंबळे विभागातील असंख्य शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनामध्ये प्रवेश केला.
कुर्डुस मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे; मात्र मागील काही दिवसात शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी झालेल्या या पक्षप्रवेशाने कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघात शेकापची उरलीसुरलेली ताकद कमी झालेली दिसून येत आहे. कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये वर्चस्व असलेल्या माजी सरपंच त्रिवेणी पाटील व युवा नेते नवनाथ पाटील, तनुजा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह कुसुंबळे विभागातील असंख्य शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्तेही शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत.
राजमळा येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य उत्तमशेठ पाटील, जीवन पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे कूर्डुस जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे.