दीक्षांत देशपांडे माथेरानचे नवे अधिक्षक
संजय गायकवाड-कर्जत
माथेरानचे बापु भोई यांची बदली झाल्यावर गेली पाच महिने येथील अधिक्षक पदाचा अतिरिक्त कारभार कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या कडे होता त्यांनीही तो यशस्वी रित्या सांभाळला पण माथेरान करता काही कामासाठी कर्जत येथे जावे लागत असे, या करता येथील रिक्त असलेले अधीक्षक पद भरणे गरजेचे होते.
शासनाने नुकतेच हे रिक्त पद भरले असून येथे सांगली येथील तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची नियुक्ती केली असून आता माथेरानची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील तसेच नव्याने रुजू झालेले अधिक्षक देशपांडे यांनी येथील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यात साठी तसेच नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याला प्राध्यान दिले जाईल तसेच शासना महसूल वाढी करता ही प्रयत्न केले जातील असे सांगितले.