पाली शहरात शेतकरी कामगार पक्षाला सेनेचा दे धक्का !
योगेश शहा , अशोक शहा शिवसेनेत प्रवेश
विनोद भोईर-पाली-सुधागड
पाली न. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाली शहरात राजकीय वारे वाहू लागले आहेत. अनेक वर्षे शेकापचे निष्ठावंत नेते योगेश शहा व अशोक शहा यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख आ. महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे जि. प. सदस्य रवींद्र देशमुख, माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, सभापती रमेश सुतार, विभाग प्रमुख किशोर दिघे, अनुपम कुलकर्णी, संजय म्हात्रे, शहर प्रमुख दादू गोळे, दिनेश चीले, हुले काका, तसेच युवा सेना तालुका अधिकारी सचिन डोबले, उपतालुका अधिकारी किरण पिंपळे, कुंभारशेत उपसरपंच किशोर खरीवले, तालुका चिटणीस मनोज भोईर, निखिल शहा, जागृत जैन, विदेश आचार्य, शहर सरचिटणीस निखिल खामकर, वितेज पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.