कोतवालवाडीत हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांना अभिवादन
ज्ञानेश्वर बागडे-नेरळ
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन आझाद दस्त्याच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला जेरीस आणणार्या विठ्ठल (भाई) लक्ष्मण कोतवाल आणि हिराजी पाटील हे सिद्धगड येथे हुतात्मे झाले. त्यांना कोतवालवाडी येथे गुरुवारी (दि.30) सकाळी तिथीप्रमाणे शौर्यवीर मयुर शेळके यांच्याहस्ते ज्योत प्रज्ज्वलित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे, कोतवालवाडी ट्रस्टच्या हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्राच्या अध्यक्षा संध्याताई देवस्थळी, नेरळच्या सरपंच उषा पारधी, कोतवालवाडी ट्रस्टचे सदस्य सावळाराम जाधव, राम ब्रह्मांडे, शरद भगत, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, अनुराधा भडसावळे, बाळा पादिर, कविता पादिर आदी उपस्थित होते.