जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी संघटित होऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे. आ. महेंद्र दळवी
प्रदीप वर्तक यांचे शिवसेनेत प्रवेश
अमूलकुमार जैन-अलिबाग
शिवसेना माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक यांनी आ.महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.यावेळी आ.महेंद्र दळवी, प्रदीप वर्तक, तुषार मानकवळे - पेण तालुका प्रमुख, अनंत पाटील - माजी उपजिल्हा प्रमुख, लहू पाटील- सरपंच सापोली, संजय पाटील काळेश्री सरपंच, अशोक वर्तक माजी शहर प्रमुख, अशिष वर्तक, दिलीप पाटील, विजय केळकर, रमेश भिकावले, संदेश यादव, प्रसाद वर्तक, रवींद्र पाटील सर, भाई गोरडे, सुभाष जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मला पक्षात घेऊन जो विश्वास आपण दाखवला तो सार्थ ठरवून पेण तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार. पेण शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असा विश्वास प्रदीप वर्तक यांनी यावेळी दिला.