ज्यांना प्रश्नच समजत नाही ते काय प्रश्न सोडवणार?
खासदार सुनील तटकरे यांचा भाजप आमदार रविशेठ पाटील यांना टोला
अमूलकुमार जैन-अलिबाग
दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की तटकरे यांच्या भूलथापांना बळी पडू नका यावर तटकरे यांनी रविशेठ पाटील यांचे नाव न घेता हा टोला लगावला.ज्यांना प्रश्न समजत नाही ते काय प्रश्न सोडवणार ,मी थापेबाज असतो तर जनतेनी 5 वेळा विधान सभेवर पाठवलं नसत,रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघात 40 मतांनी विजयी झालो असतो असे तटकरे यांनी सांगितले मी पेण मध्ये येतो म्हणून ते कुंभकर्ण झोपेतून उठले अशीही टीका तटकरे यांनी केली