कोरेगाव मध्ये आ. महेश शिंदे यांची बाजी; आ. शशिकांत शिंदेंना धक्का
मिलिंद लोहार-सातारा
जिल्ह्यात 6 नगर पंचायती चे निकाल जाहीर झाले. यामध्ये कांटे की टक्कर असणाऱ्या कोरेगाव नगर पंचायतमध्ये आ. महेश शिंदे यांच्या पॅनल ने 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला. तर आ. शशिकांत शिंदे यांच्या पॅनल ला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले.कोरेगावच्या विजयी उमेदवारांनी आमदार महेश शिंदे यांना खांद्यावर उचलून घेत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.