माजी नगरसेवक तुकाराम साबळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश .
खोपोली राष्ट्रवादीची ताकद वाढली .
दत्ता शेडगे-खोपोली
अनेक टर्म नगरसेवक राहिलेले खोपोली पालिकेतील जेष्ठ नगरसेवक तुकाराम लक्ष्मणशेठ साबळे यांनी बुधवारी अखेर खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. तुकाराम साबळे यांच्या प्रवेशाने खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाल्याचे यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.यावेळी खालची खोपोली या शिवसेनेच्या गडातील निखिल ढोले व सुनिल पुरी यांनी ही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यापूर्वी तुकाराम साबळे हे भाजपचे नगरसेवक होते . मागील महिन्यात त्यांनी भाजप नगरसेवक व पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिला होता . राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या सह जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड , माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे , शहर अध्यक्ष मनेश यादव , जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेवक कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव , खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील , निलेश औटी यांच्या सह अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.