सुधागड काँग्रेस युवक अध्यक्षपदी प्रेमकांत खाडे यांची निवड
विनोद भोईर-पाली-सुधागड
सुधागड तालुका काँग्रेस पक्षाच्या युवकाध्यक्ष पदी रासळ येथील प्रेमकांत कृष्णा खाडे यांची तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली . त्यावेळी त्यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. खाडे यांनी त्याच्या युवा राजकीय, क्रिडा व सामाजीक कार्यातून आपल नाव कमावल असून ते एक अष्टपैलू कबड्डी पंटू देखील आहेत. सदर निवडी बाबत त्यांनी बोलताना सांगीतले की. काँग्रेस पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी सोपविली आहे त्यांच मी प्रामाणिकपणे काम करून सुधागड तालुक्यात कॉग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी ग्रामीण भागातून सुरुवात करून तेथील युवकांची फली मजबूत करून काँग्रेसची ताकद वाढविणार असल्याचे वचन दिले,तसेच खाडे यांना बंड्या मारुती कबड्डी मंडळ रासळ, हनुमान नाट्य मंडळ रासळ, विक्रम चालक मालक संघटना पाली यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या