पनवेल येथील गाव दर्शक फलक एकाच साखळीवर
संजय गायकवाड -कर्जत
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात एमजी रोड तक्का येथे उभारण्यात आलेल्या गावे दर्शक कमानीवर पुणे, रेल्वे स्टेशन पनवेल आणि मुंबई असे तीन फलक कमानीवर लटकवलेले आहे, त्यापैकी मुंबई कडे जाणारा फलक हा एकाच साखळीवर लटकलेला दिसत आहे, हा फलक पडून पादचारी, मोटरसायकल वाहक किंवा चारचाकी वाहनांवर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे संबंधित कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.
फलक लावल्यावर त्याबाबत वेळोवेळी डागडुजी झाली पाहिजे नाहीतर त्याकडे लक्ष न दिल्यास फलकांमुळे अपघात होऊ शकतात याची जबाबदारी संबंधित कार्यालयावर असेल