अपहरण झालेला स्वर्णव पुनावळा येथे सापडला, अपहरणकर्ते गेले पळून
मिलिंद लोहार-पुणे
स्वर्णव उर्फ डुगु असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. एक दुचाकीस्वार त्यालादुचाकीवरुन घेऊन गेला होता. याचे चित्रिकरण सीसीटीव्ही मध्ये झाले होते.
डुगुचे अपहरण झाल्यापासून पुणे शहर पोलीस त्याचा शोध घेत होते. संपूर्ण पोलीस यंत्रणा त्याच्या शोधात लागली होती. अपहरणकर्त्यांनी कोणतीही मागणी किंवा फोन नातेवाईकांना केला नव्हता, त्यामुळे तपासात अडचण निर्माण झाली होती डुगूचा शोध घेणे एक आवाहन निर्माण झाले होते. त्याच्या वडिलांनी सर्वपरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर आज बुधवारी दुपारी डुगूपुनावळे परिसरात आढळून आला. अपहरणकर्ते त्याला सोडून पळून गेले आहेत.
दादाराव जाधव देवासारखे धावुन आले
हेच ते सुरक्षारक्षक दादाराव जाधव आहेत ज्यांच्याकडे आरोपीने मुलाला सोपवले व तेथून पळ काढला. जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून पोलीसांना माहिती दिली.