उद्या नागोठण्यात खासदार सुनिलजी तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थिती
शासनाच्या मिळालेल्या परवानगी नुसारच साजरा होणार पत्रकार असो.चा वर्धापन दिन सोहळा
विनोद भोईर-पाली-सुधागड
खासदार सुनील तटकरे यांचे वडील स्व. दत्ताजी तटकरे यांचे परममित्र नागोठण्यातील तत्कालीन समाजसेवक स्व. पांडुरंग उर्फ तात्यासाहेब टके यांचे सुपुत्र दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाने असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार आणि अध्यक्ष ऍड. महेश पवार यांच्या मेहनतीने नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन गेली नऊ वर्ष सातत्याने आपला वर्धापन दिन साजरा करत असल्यामुळे पत्रकार असोसिएशनने आपला नावलौकिक नागोठणे शहर व ग्रामीण विभागात मिळवलेला आहे. आताही नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन आपला दहावा वर्धापन दिन सोहळा मोठया दिमाखात रविवार दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात साजरा करत असून पहिल्या वर्धापन दिनापासून उपस्थित राहत असलेले खासदार सुनील तटकरे आताच्या दहाव्या वर्धापन दिनी सुद्धा उपस्थित राहणार आहेत ते केवळ आणि केवळ आपले पितृतुल्य व्यक्तिमत्व स्व. तात्यासाहेब टके यांच्या नावाचा दिला जाणारा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारामुळे. या कार्यक्रमाला रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख आ.महेंद्र दळवी, आ.अनिकेत तटकरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कामगार नेते महेंद्र घरत, शिवसेना जिल्हा सल्लागार व राजिप सदस्य किशोर जैन यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम शासनाकडून मिळालेल्या परवानगी नुसारच साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार असोसिएशनचे सचिव अनिल पवार यांनी दिली.
वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नागोठण्यातील रहिवासी असलेले व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र माहिमकर यांना कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराह पेण येथील पत्रकार देवा पेरवी यांना उत्कृष्ठ तर खेड(रत्नागिरी) येथील दै. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार चंद्रकांत बनकर यांना युवा पत्रकार पुरस्कार देणार येणार असल्याचीही माहिती अनिल पवार यांनी दिली. दरम्यान वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष धम्मशील सावंत, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, सुनील कोकळे, चेतन टके, राजेश पिंपळे, सचिन नेरपगार आदी मेहनत घेत आहेत.