कोणतेही पक्षभेद न करता ज्या ज्या शाळांना समस्या आहेत त्या सोडविण्यात येतील
आमदार बाळाराम पाटील यांचे प्रतिपादन
संजय गायकवाड-कर्जत
कर्जत तालुक्यातील शिक्षक आणि शाळांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी चिंचवली - डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालय सभागृहात आमदार बाळाराम पाटील यांनी बैठक घेतील. यावेळी शे . का . प . जिल्हा खजिनदार तसेच प्रभारी कर्जत तालुका चिटणीस राम राणे,ज्येष्ठ नेते विलास थोरवे, आदीजन विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राहूल तिटकारे, वैशाली तिटकारे, आदीजन विद्याप्रसारक मंडळ सदस्य सुरेश सावंत, मध्यवर्ती शेकाप सदस्य भाई आकाश निर्मळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रविंद्र झांजे, वैभव भगत,जिल्हा समन्वयक बबन म्हात्रे, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना आजपर्यंत वाटप केलेला निधी आणि साधने याची माहिती दिली. यावेळी तालूका कार्यकाराणीची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हावरे यांनी केले, प्रास्ताविक बबन म्हात्रे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी. डी.वाखारकर सर यांनी मानले.