मुरबाड नगरपंचायतवर पुन्हा एकदा भाजपाची सत्ता
दिग्गजांना पराभवाचा झटका
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी शिवसेनेकडून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे , जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील , ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार प्रचारात उतरले होते तर भाजपाचे केंन्द्रीय मंत्री कपिल पाटील ,आमदार किसन कथोरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. निवडणुक प्रचारात दोन्ही पक्षाकडून श्रेयासाठी आरोप - प्रत्यारोप झाले असले तरी मुरबाडकरांनी भाजपा पक्षाला पुन्हा बहुमताचा कौल दिल्याचे चित्र दिसले आहे. मागिल निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला होता परंतु यावेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस , कॉंग्रेस, मनसे , प्रहार जनशक्ती पक्षाला खाते सुद्धा उघडता आले नाही. तसेच मतदारांनी काही दिग्गज उमेदवारांना नाकारले असून माजी नगराध्यक्ष पद भुषविलेले प्रभाग क्रमाक 5 मधून किसन अनंत कथोरे व प्रभाग क्र, 7 मधुन माजी नगराध्यक्षा शितल तोंडलीकर ह्या पराभूत झाल्या आहेत. प्रभाग क्र. 1 व 17 मध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. एकंदरीत मुरबाडकरांनी केंन्द्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा भाजपा पक्षाच्या हातात मुरबाड नगरपंचायतीची सत्ता दिली असून शिवसेना विरोधात बसणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.
विजयी उमेदवार
- . १) दिक्षीता भरत वारे ( अपक्ष )
- २) मानसी मनोज देसले ( भाजपा )
- ३) रामचंद्र भगवान दुधाळे ( भाजपा )
- ४) नम्रता नंदकुमार जाधव ( भाजपा )
- ५) विनोद रामचंद्र नार्वेकर ( शिवसेना )
- ६) नम्रता नितीन तेलवणे ( शिवसेना )
- ७) अक्षय नंदकुमार रोठे ( शिवसेना )
- ८) उर्मिला सुजित ठाकरे ( भाजपा)
- ९) रविना विनायक राव ( भाजपा )
- १०) मोनिका स्वप्नील शेळके ( शिवसेना )
- ११) मुकेश बबन विशे ( भाजपा)
- १२) मोहन भालचंद्र गडगे ( भाजपा)
- १३) संतोष दिलीप चौधरी ( भाजपा )
- १४) नितीन लक्ष्मण तेलवणे ( शिवसेना )
- १५) मधुरा मोहन सासे ( भाजपा )
- १६) स्नेहा राजन भोईर ( भाजपा )
- १७) अनिता भगवान दुधाळे ( अपक्ष )