पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता दूतांना ब्लॅंकेटचे वाटप
महाराष्ट्र मिरर टीम -पनवेल
ब्रम्हगुरु फाऊंडेशनचे मुख्य फाउंडर हनुमंत शिंदे, सदस्य ब्रिजेश सिंग, लक्ष्मण शिंदे, इंदुबाई शिंदे यांच्या उपस्थितीत ब्रह्म गुरु फाउंडेशनचे उद्घाटन ग्रीन व्हॅलीचे डायरेक्टर सुहास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांच्या हस्ते कामोठे विभागातील 38 स्वच्छता दूत यांना ब्लॅंकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सुहास जाधव, तसेच पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आप्पा गायकवाड व सुनील पाटील यांनी देखील ब्रम्ह गुरु फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन आदित्य दृष्टि सामाजिक विकास प्रतिष्ठान, संस्थापक कॅप्टन अंशु अभिषेक,अध्यक्ष सुधा सिंह यावेळी उपस्थित होते.