महात्मा गांधी विद्यालय धसई येथे कोविड लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
सुधाकर वाघ-मुरबाड
शासनाने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मुरबाड तालुक्यातील केंद्रावर लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धसई यांच्याकडुन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई येथे शुक्रवारी 15 ते 18 वयोगटातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी महाविद्यालयातील 245 विद्यार्थींनी लसीकरण करुन उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला असल्याचे धसई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदकिशोर गोरडे यांनी सांगितले. या लसीकरण मोहिमेत महात्मा गांधी विद्यालयातील प्राचार्य प्रमोद घोलप, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.