पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण जाहीर, सर्वसाधारण महिला; कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष
प्रकाश कदम-पोलादपूर
पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व दाखवत दहा जागा निवडून नगरपंचायत वर आपला भगवा झेंडा फडकला आहे. यामध्ये काँग्रेसने देखील सहा जागांवर वर्चस्व मिळवले तर भारतीय जनता पार्टीने एका जागेवर खाते खोलले आहे.गुरुवारी सायंकाळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपंचायत वर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता पार्टे, अस्मिता पवार, सोनाली गायकवाड,स्नेहा मेहता, शिल्पा दरेकर या महिला नगरसेविका पैकी कोणाला संधी मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे