शिराळा परिसरात एकाच दिवशी बारा गव्यांचे नागरीकांना दर्शन.
उमेश पाटील -सांगली
गव्याचा गोंगाटात एकुण बिबट्याचे पलायन. शेतकरी व नागरिकांच्यामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील वस्तीवरील शेंकडो कुत्री बिबट्याच्या हल्यात झालेत रातोरात गायब. वन विभाग गावोगावी जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
शिराळा शहरानजीकच असणाऱ्या धुमाळवाडी, गोरक्षनाथ मंदिर, शिंगटेवाडीसह पवारवाडी व कापरी , जांभळेवाडी व परिसरात चार तर पावलेवाडी, बिऊर, भाटशिरगांव या भागात आठ गवे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
शिराळा परिसरात बिबट्याच्या भितीने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यामध्ये अगोदरच भितीचे वातावरण आहे. शेकडो कुत्री व शेळ्यामेंड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. आता एक डझन गवे परिसरात निदर्शनास आल्याने नागरिक व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे व काळजीचे वातावरण पसरले आहे. सध्या परिस्थिती पहाता बिबट्याने अनेक वस्तींवरील पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष केले आहे. तर गतवर्षी तडवळे येथील ऊसतोड मजुरांच्या लहान बालकाला बिबट्याने आपली शिकार केल्यामु़ळे शेतकरी व नागरिक अगोदरच भयभित असताना आता गव्यांचा वावर पहावयास मिळत असल्याने सध्या परिस्थिती पहाता शेतकरी पुर्णत: हतबल झाले आहेत.
शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्याचे दर्शन रात्री अपरात्री कधीही होत आहे.. पाठोपाठ आता गव्याचे ही दिवसा व अपरात्री दर्शन होत असल्याने शेती कामांनाही खोडा बसणारं यात शंका नाही.
काही दिवसांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये अपेक्षित खाद्य मिळत नसलेने बाहेर मानवीवस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे. बिबटे, माकडं, वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे. त्यात आता गव्यांची भर पडली आहे. शिराळा शहरासह तालुक्यात दररोज कोणत्या ना कोणत्या प्राण्यावर बिबट्याचा हल्ला झालेला असतो. परंतु रोजचे 'मडे त्याला कोण रडे' या म्हणी प्रमाणे कुत्र्यांच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. रोज तक्रार कोणं करणारं. तर माकडं व वानरे हे पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहेत . त्यात या सर्वांबरोबर गव्यांची भर पडली आहे.
तरी वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, वनरक्षक देवकी ताहसिलदार, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनमजूर संपत देसाई, नामदेव शिद, संभाजी पाटील, आदीसह कर्मचारी वर्गाने सर्व भागात फिरून लोकांना मार्गदर्शन करुन जनजागृती सुरू केली.