पेण पोलिसांनी फरार आरोपीला अखेर शिताफीने केल जेरबंद
देवा पेरवी-पेण
वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला होता. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने नाकाबंदी करून व शोध पथके तयार करून संपूर्ण पेण शहरात कोंबिंग ऑपरेशन करीत अवघ्या काही तासात त्या आरोपीला पुन्हा जेरबंद केले आहे.
आरोपीला शोधण्यासाठी आठ तुकड्या तय्यार करुन तातडीने कोंबींग ऑपरेशन सुरू केले. त्याला यश येत रविवारी रात्री सदर आरोपी पेण शहरातील अभ्युदय बँकेच्या परिसरात लपून बसलेला आढलून आला. त्याला जेरबंद करीत पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.