एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प मुरबाड तर्फे पंचायतराज संस्था मधील महिला लोक प्रतिनिधींचा मेळावा संपन्न
सुधाकर वाघ-मुरबाड
जिल्हा परिषदेच्या एकात्मिक महिला व बालविकास विभाग, पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प-1 यांच्या माध्यमातून पंचायतराज महिलाशक्ती अभियान अंतर्गत पंचायतराजमधील महिला प्रतिनिधींचा महिला मेळावा व मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्र शिवळे येथे करण्यात आले. मुलांचे संगोपन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे झालेल्या कार्यक्रमात बेबी केअर किट वाटपा बरोबरच महिलांना आरोग्याविषयक माहिती, कोविड विषयक माहिती, महिला कायदे, महिलांचे संरक्षण आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संतुलीत आहार मिळावा यासाठी घरगुती तृणधान्य, रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे, पंचायत समितीच्या उपसभापती स्नेहा धनगर, पंचायत समितीच्या सदस्या पद्मा पवार, शिवळेच्या सरपंच निलिमा जाधव, उपसरपंच नरेंद्र ईसामे, ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण खोळांबे, मुरबाड बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती लंगूटे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती बोटे आदींसह अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.