जेष्ठ नागरिक संघाला नगरपरिषदेकडून कपाट, टेबल भेट
संजय गायकवाड-कर्जत
कर्जत मधील जेष्ठ नागरिक संघाला नगरपरिषदेने मुद्रे नानामास्तर नगरमध्ये व्यायाम शाळेच्या पहिल्या मजल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यालय असावे म्हणून ती खोली उपलब्ध करून दिली आहे, ह्या खोलीत ज्येष्ठ नागरिकांना त्यांची कागदपत्र ठेवण्यासाठी लोखंडी कपाट व टेबल देण्यात आले आहे. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, उपाध्यक्ष अच्युत कोडगिरे,सचिव कृष्णा लाड आणि सदस्य सुरेश कुडतरकर यांच्याकडे भेट सुपूर्द करण्यात आली.