खासदार श्रीरंग बारणे यांचे कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले अभिनंदन
संजय गायकवाड-कर्जत
17 व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच झालेल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांच्या यादी संसदेच्या 1 जून 2019 ते 22 डिसेंबर 2021 लोकसभेतील कामगिरीच्या रेकॉर्ड मधील नोंदीनुसार पी आर एस या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहीर केली आहे, यामध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची देशाच्या 543 खासदारांच्या मध्ये 2 नंबरची कामगिरी राहिली आहे.त्याबद्दल कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी त्याची भेट घेवून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे, याप्रसंगी युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी, माथेरान शिवसेना नेते प्रसाद सावंत, नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, उद्योजक केतन जोशी उपस्थित होते.