तळा नगरपंचायत निवडणूकीसाठी चार जागेसाठी २३ अर्ज दाखल
किशोर पितळे-तळा
तळा नगरपंचायत निवडणुक २१ डिसेंबर रोजी पार पडली त्यावेळी १२ जागेसाठी मतदान पार पडले एका जागेवर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने बारा जागेवर ३५ उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडली होती ओबीसी आरक्षणामुळे ४ जागेवर स्थगीती आल्यामुळे त्या जांगावरती २३डिसेंबर२०२१ रोजी पुन्हा सर्वसाधारण मधून पडलेल्या आरक्षणानुसार दोन ठिकाणी सर्वसाधारणमहिलांसाठी व दोन ठिकाणीसर्वसाधारण आशा या चार ठिकाणी निवडणूक १८ जानेवारी रोजी पार पडणार आहे त्यासाठी २९ डिसेंबर पासून अर्ज दाखल करण्यात आले होते आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल झालेत्यात राष्ट्रवादी८,शिवसेना६,भाजपा ३, शेकाप २,अपक्ष ४,या होणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावून लढविणार आहेत. या चार जांगावरती नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेचे खरी सूत्र आवलंबून आहेत.त्यामुळेसर्वच पक्षत्यादृष्टीने पुढील रणनिती आखत आहेत.अर्जमागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतोय हेही पाहण्याजोगा असून आता पुढे सर्वच लढती चुरशीच्या होणार आहेत.