कर्जत नगरपालिका हद्दीत गृहनिर्माण नवनवीन प्रकल्प येत असून त्यामुळे येथे विद्युत पुरवठयाची मागणी वाढली असून सध्या जो ट्रान्स्फर आहे तो कमी क्षमतेचा असून त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अपुरा विद्युत पुरवठा होत असून वारंवार फ्यूज उडतो आणि विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांना हकनाक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते,नागरिकांच्या वाढत्या मागणीकडे महावितरण कंपनीने लक्ष घालून दहिवली भाग अधिक क्षमतेचा ट्रान्स्फर बसवावा अशी मागणी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक शरद लाड यांनी विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.