प्रा.संतोष भोईर यांची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रमुख पदी नियुक्ती
विनोद भोईर-पाली
तालुका प्रशासन व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सुधागड तालुक्यातील विविध गावांत ग्रंथालय उभारणी केली जात आहे. या माध्यमातून गावागावात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले जात असून, येथील विद्यार्थी, तरुण व युवकांना स्पर्धा व इतर परीक्षांचे मोफत मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच, या केंद्राद्वारे पोलीस व सैन्य भरती आदींचे मार्गदर्शन व शिबिरे भरविली आहेत. या स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी प्रा. भोईर यांना देण्यात आली आहे. विविध प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने भोईर केंद्राचे कामकाज पाहणार आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणार आहेत.