किल्ले बळवंतगड संवर्धन व स्वच्छता मोहीम
संजय गायकवाड-कर्जत
टाक्या स्वछता, सूचना फलक, स्थळ दर्शक आणि दिशा दर्शक हे पर्यटकांच्या माहितीसाठी तर नुकताच गडावरील गड देवतेच्या मंदिराला पत्राचे शेड बसविण्यात आले आहे. गडावरील जमिनीत गाडले गेलेले शौचकूप आणि घरांचे चौथरे मोकळे करून उजेडात आणण्यात आले आहेत. असे शहापूर विभाग अध्यक्ष अनिरुद्ध थोरात यांनी सांगितले तर गडावर सलग स्वछता मोहिमा घेऊन आणखी कामे करण्यात येतील असे संपर्क प्रमुख -मच्छीन्द्र अडोळे यांनी सांगितले.
नववर्षाची सुरवात गडसंवर्धन करून व्हावी म्हणून ठाणे व मुंबई मधील संस्थेच्या सदस्यांनी 2 जानेवारी 2022 रोजी बळवंतगडावर स्वछता मोहीम घेतली असे मुंबई विभागाचे पदाधिकारी राजाराम खरात बोलले.ठाणे जिल्ह्यातील गडकोट मोठ्या प्रमाणात जतन आणि संवर्धन व्हावेत म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे असे संस्थेचे कार्याध्यक्ष माजी आमदार संजय केळकर यांनी सांगितले तर मोठ्या प्रमाणात या संवर्धन चळवळीत शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले