बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयाच्या पटांगणात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
आरोपीला पोलिसांनी केली अटक
अमूलकुमार जैन-मुरुड
मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बोर्ली येथे साने गुरुजी विद्यालयाच्या पटांगणात पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी आरोपीस 31 तारखेच्या रात्रीच्या सुमारास रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची हकीगत अशी,की,मौजे बोर्ली हायस्कुलचे पटांगणात पीडीत मुलगी वय 15 वर्षे ही बोर्ली हायस्कुल येथे शाळेत जात असताना आरोपीत रा.सध्या रा,कमाने हॉटेलचे वर बोर्ली ता.मुरूड याने सदरची मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिचे पाठोपाठ चालत येवुन तिचा पाठलाग करून तिचा बोर्ली हायस्कुलचे पटांगणात येवुन हात पकडुन,मिठी मारून,किस करून,तु माझे सोबत चल तुला पैसे देतो असे बोलुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.134/2021 भा.दं.वि.क. 354 , 354 A (i),(ii),354 D, बाल लै. अत्या. संरक्षण (POCSO)अधिनियम, 2012 7,11(1),12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद चिमडा हे करीत आहेत.