काशीद समुद्र किनारी बेपत्ता झालेला आठ वर्षीय मुलगा सापडला:आई वडिलांचे दुर्लक्ष
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्हयातील काशीद समुद्र हा पर्यटनासाठी देशविदेशात प्रसिद्ध आहे.काशीद समुद्र किनारी आज पुणे लष्करी कॅम्प येथून जावेद अहमद सयानी मेनन हे आपल्या परिवरसोबत मुरूड तालुक्यातील काशीद येथे समुद्री पर्यटनासाठी आले होते.काशिद समुद्रात स्नान करण्यासाठी जावेद अहमद सयानी मेनन हे त्यांच्या पत्नी मिनाज मेनन आणि आठ वर्षाचा मुलगा महंमद मुसा मेनन यांच्यासाहित गेले.मात्र तेथे आईवडील पाण्यात खेळण्यात दंग असताना त्यांचे मुलाकडे दुर्लक्ष झाले.महंमद मेनन हा पाण्यात खेळता खेळता कंटाळा आल्याने ततो पाण्यातून बाहेर पडून इकडे तिकडे भटकू लागला.मुलगा हा एकटाच फिरत आहे हे काशीद येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार युवराज निकाले यांच्या नजरेत आली.त्यानी ताबडतोब तो मुलाला जवळ घेत त्याच्याकडून माहिती घेत आईवडील यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.आई वडील हे पाण्यात मौजमजा करीत असताना त्यांचे दुर्लक्ष झाले आणि मुलगा हा बेपत्ता झाला.मात्र पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी सतर्कता दाखवली असल्याने मुलगा हा बेपत्ता होता होता वाचला आहे.पोलीस हवालदार युवराज निकाले याच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काशीद येथे पर्यटनासाठी येताना पर्यटक यांनी आपल्या कुटुंबासाहित मित्र मंडळी यांच्यावरही मौजमजा करताना लक्ष ठेवावे.अन्यथा आपण मौजमजा करण्यासाठी येतो आणि आपल्याच चुकीमुळे चूकीमुळे संकटात येतो.तरी पर्यटकांनी योग्य काळजी घ्यावी
नितीन गवारे.पोलीस निरीक्षक,मुरूड