धनलक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरमनपदी "वैशाली मपारा" तर व्हाईस चेअरमनपदी "हर्षा चांदोरकर"
विनोद भोईर-पाली
धनलक्ष्मी महीला सहकारी पतसंस्था पुनर्जीवित करण्यात आलीअसून त्या पतसंस्थेच्या चेरमनपदी वैशाली राजेश मपारा तर व्हाईस चेअरमनपदी हर्षा अभिजीत चादोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आणि संचालक मंडळामध्ये स्वरदा साने, आरती भातखंडे, अनघा भातखंडे, आरती धारीया सुजाता लखीमले, दर्शना शहा, अमृता सावंत, लक्ष्मी पवार आदि महीलांची वर्णी लागली आहे.
मागील 10 ते 15 वर्षापूर्वी या संस्थेची पाली मध्ये स्थापना काही महीलांनी केली होती. मात्र काही वर्षातच त्याचा कारभार थांबला. त्यानंतर वरील होतकर अणि उच्चशिक्षित महिलांनी हि संस्था पुनर्जीवित करण्याचे ठरविले आणि सहकार विभागातून संपूर्ण कागदोपत्रीची पूर्वता करून त्यांच्या नियमानुसार ही पतसंस्था आता पुन्हा नव्या वर्षात नव्या उमदीने महिलांना त्याची आर्थिक जडघडण करून देण्याच्या हेतूने सुरू करीत असल्याचे चेअरमन वैशाली मपारा यांनी सांगीतले. तसेच या पतसंस्थेच्या जुने खातेदार, कर्जदार नवीन होऊ पाहणारे खातेदार यांनी आमच्या संचालक मंडळाकडे काही शंका अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.