रायगड जिल्ह्य मराठी भाषा समिती सदस्यपदी चंद्रशेखर देशमुख.
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
महाराष्ट्र राजभाषा सुधारणा अधिनियम २०२१, अधिसूचना दिनांक १६/७/२०२१ महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणार्सा तक्रांरींचे निवारण करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील केंन्द्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बॅंन्का, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंन्द्रीय आस्थापना या सर्व कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबत तक्रांरींचे निवारण करण्यासाठी व मराठी भाषेसंदर्भात उपक्रम राबविण्यासाठी सदर अधिनियमातील नियम ५ड नुसार मराठी भाषा समिती गठित करण्याचे नमुद केले आहे. या समितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नव्याने समितीमध्ये स्वत:हा जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानी असून सदस्यपदी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक, आयुक्त पनवेल महानगरपालिका, शिक्षणाधिकारी राजिप यांच्यासह जिल्ह्यातील चार प्रतिष्ठित इंदापूर येथील चंन्द्रशेखर देशमुख यांच्यासह रोहा तालुक्यांतील मकरंद बारटक्के, श्रीमती सुजाता पाटील, महाड तालुक्यांतील शोभाताई सावंत यांची समिती झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सुधारीत आदेश जाहीर केला आहेत.
इंदापूर येथील प्रतिष्ठित चंद्रशेखर देशमुख यांची निवड झाल्यानंतर दक्षिण रायगडचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.