श्रमजीवी जनता विद्यामंदिर व ज्यू. कॉलेज पोशीर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
श्रमजीवी जनता विद्यामंदिर व ज्यू. कॉलेजच्या एस्. एस्. सी. १९९७ - ९८ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हरवलेली ही पाखरे वॉट्सअप व फेसबुकसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल २३ वर्षांनी एकत्र आले. स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थींनी एकत्र येत एक अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी संपन्न केला. कोरोनामुळे सतत तीन वर्षे पुढेपुढे जात असलेला स्नेह मेळावा नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त साजरा करत असताना शाळेतील एकूण ७० माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. स्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थान शाळेचे विद्यमान उपप्राचार्य मा. श्री. माने यांनी भुषविले.. यावेळी मा. साठे , मा. बी. एन. पाटील , म्हात्रे मॅडम हे माजी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन खूपच सुंदररित्या केले होते.. यामध्ये सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थींनींनी सहभाग घेतला..
जे माजी विद्यार्थी व शिक्षक दिवंगत आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि या स्नेह मेळाव्यात एस. एस. सी. बॅच १९९७ - ९८ यांनी शाळेला नविन इमारत बांधण्यासाठी माजी विद्यार्थी कै. प्रमोद खंडू शेकटे याच्या स्मरणार्थ ५१००० /- रू. निधी भेट दिला.. सर्व माजी शिक्षक, विद्यमान शिक्षक आणि माजी विद्यार्थी विद्यार्थींनीचा याठिकाणी सन्मानचिन्ह, शाल- श्रीफळ व पुस्तकाच्या स्वरूपात सत्कार करण्यात आला. मेळाव्यामध्ये उपस्थित माजी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थांना त्यांच्या प्रगातीसाठी शुभेच्छा दिल्या.. उत्कृष्ट कार्यक्रम नियोजन व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
मेळाव्याच्या शेवटी सर्वांनी एकमेकांशी हितगुज करत, सुख - दु: ख वाटत आणि फोटो घेत आनंदाश्रुंनी निरोप घेतला..