श्रीवर्धन जीवना कोळी वाडा व भरडखोल येथील शेकडो मच्छिमारांनी बुडालेली लक्ष्मी विजय नौका काढली बाहेर.
विजय गिरी-श्रीवर्धन
श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्यव्यावसायिक संस्थेतील लक्ष्मी विजय नौका IND MH 3 MM 4193 या नौकेला जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते .त्या मधील चार खलाशी हे मुत्यूशी झुंज देत बालंबाल बचावले होते.
मच्छिमारांना पुरेसे मासे मिळत नसल्याने मच्छीमारी आर्थिक संकटात सापडले आहेत.रविवारी दुपार नंतर अचानक समुद्रा मध्ये दक्षिणेकडील सोसायट्यांच्या वादळ वारे वाहयला सुरुवात झाली. त्यामुळे मच्छीमार भयभीत होऊन आपआपल्या नौका व जीव मुठीत धरून नौका मुळगाव येथील खांडी मध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असतांना वाऱ्याचा प्रचंड वेग व समुद्राने घेतलेल्या रौद्र रुपापुढे मच्छीमार हतबल झाले. त्यांमध्येच अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांची 'लक्ष्मी विजय' नौकेचे सुकाणू तुटल्याने नौका भरकटली व दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरिबंदर टोकाजवळ जलसमाधी मिळाली . त्या नौकेमधील बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर हे समुद्राच्या पाण्याजवळ झुंज देत बालबाल बचावले. मात्र अनिकेत रघुविर यांची नौका लक्ष्मी विजय व जाळी, पकडून सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
सदर बुडालेली लक्ष्मी विजय नौका बाहेर काढण्यासाठी जीवना कोळी वाडा येथील येथील सर्वच मच्छीमार व भरडखोल येथील शेकडो मच्छीमार अश्या प्रकारे पाचशे पेक्षा जास्त मच्छीमार आपल्या छोट्या मोठ्या नौका घेऊन मदतीला गेले होते. जीवाची परवा न करता आपली बाजी लावुन चार ते पाच तास अथक परिश्रम घेऊन ती नौका काढण्यात यश प्राप्त झाले. अखेर ती नौका जीवना बंदर या ठिकाणी आणल्या वर ती समुद्राच्या पाण्यातून वर काढण्यासाठी शेकडो महिलांनी सहकार्य केले.