सुधागड तालुका कॉग्रेस पक्षांची नवीन कार्यकारणी जाहीर
विनोद भोईर-पाली सुधागड
सदर सबैठकीत पाली शहर अध्यक्षपदी राजेश पिंपळे, पाली शहर महीला अध्यक्षपदी प्रियंका नाईक, सुधागड तालुका युवक अध्यक्षपदी प्रेमकांत कृष्णा खाडे, सोशल मिडाया तालुका अध्यक्ष पदी, वैभव जोशी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी रशित शेख आदि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच पाली नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधून आक्रम शेख यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली.
सदर बैठकी मार्गदर्शन करताना चद्रकांत पाटील म्हणाले की आपल्याला पाली नरपंचायतीमध्ये किमान दोन तरी सदस्य निवडूण आणायचे आहेत. बाबा कुळकर्णी यांचा विजय तर निश्चीतच आहे. परंतु प्रभाग पाच मधून आक्रम शेख यांना देखील विजयी करण्याकरीता नवनिर्वाचित पदाधियांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्रीपाद वैद्य, बाबुबाई शेख आदिसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.