पुष्कर राजस्थान येथे राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू व कमिटी सदस्याचा जाहीर सत्कार.
किशोर पितळे-तळा
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रसाद भोईर आणि पुष्कर राजस्थान येथे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया फॉर डिसेबल्ड यांनी माजी मुख्यमंत्री स्व. जनार्दनसिंह गहलोत स्मृती प्रतियोगिता राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रोहा रायगड याच्या कडून महाराष्ट्र व मुंबई पॅरा कब्बडी संघ असे दोन संघ सहभागी झाले होते. यापैकी महाराष्ट्र संघातील रमेश संकपाळ (कर्णधार), मुकुल खाडे तर मुंबई संघाचे मंगेश म्हात्रे(कर्णधार), गणेश पाटील, महाराष्ट्र व मुंबई या दोन्ही संघाचे व्यवस्थापक व सचिव शिवाजीपाटील,असोसिएशनचे अध्यक्ष शशांक हिरवे , सह व्यवस्थापक बाबाराव धोत्रे व स्पोर्टस कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया फॉर डिसेबल्डच्या भारतीय संघात निवड झालेल्या महाराष्ट्र संघातील राजेश मोकल पेण, अक्षय निकम रोहा, ओमकार महाडिक माणगाव, महेश वसावे नंदुरबार, आणि मुंबई संघातील रायसिंग वसावे नंदुरबार व जोतिराम कदम सांगली यांचा जाहिर सत्कार ग्रूप ग्रामपंचायत काराव माजी आजी सदस्य, ग्रामस्थ व कालंबादेवी मित्रमंडळ काराव याच्याकडून करण्यात आला. आर एन म्हात्रे सर यांनी आपल्या प्रास्ताविकेत कबड्डीचा इतिहास सांगितला संस्थेचे सचिव व दोन्हीं संघाचे व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी आपल्या भाषणात पॅरा क्रिकेट आणि कबड्डी या दोन्ही संघाची निर्मिती कुलाबादिव्यांगक्रिडाअसोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक हिरवे व सचिव शिवाजी पाटील तसेच उपाध्यक्ष सुनिल पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष कल्पेश टवले, संचालक विवेक कदम, मंगेश म्हात्रे व रमेश संकपाळ याच्या प्रयत्नाने करण्यात आले व त्यासाठी गडब ग्रामस्थ माजी उपसरपंच नितिन पाटील, टाटा पावर सेवानिवृत्त सेवक रमेश म्हात्रे,अजय म्हात्रे , हुतात्मा हिरवे गुरूजी सामाजिक विकास मंडळ पनवेल पदाधिकारी तसेच रोहा तालुक्यातील वेलशेत ग्रूप ग्रामपंचायातचे सरपंच संतोष कोळी,रोह्याचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर,रोठ ग्रामपंचायत सरपंचनितिनवारंगे,वरसेग्रामपंचायत चे सरपंच नरेश पाटील, खालापूर मधील वावंढळवाडीतील रमेश व रवि काईंनकर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सांगितले. तर रायगड जिल्हा कब्बडी असोसिएशनचे नव निर्वाचित कार्याध्यक्ष प्रसाद भोईर यांनी असे सागितले की जसे इतर देशात कब्बडी ट्रेनिग सेंटर आहे ज्यात राहण्याची व्यवस्था व जे खेळाडू असतील अशाना स्टाय स्पेंड दिले जाईल त्यामुळे खेळाडूंना आर्थिक अडचणी कमी होतील व खेळा कडे खेळाडू लक्ष देतील. तसेच त्यांनी असेही आश्र्वासन दिले आहे की भविष्यात दिव्यांग पॅरा कब्बडी च्या विकासासाठी व स्पर्धेच्या नियोजनात माझा मदतीचा हात सतत राहील. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन एस वाय लांगी व सर जे. के म्हात्रे यांनी केले.