मेडीकल टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ रायगडच्या वार्षीक परीषदचे 26/27 फेब्रुवारी रोजी महाबळेश्वर आयोजन
विजय गिरी-श्रीवर्धन
दोन दिवसीय परीषदेत डॉ .शामला लाहोटी कुलकर्णी ,प्रोफेसर प्रकाश पांगम यांच्या मार्गदर्शन सह विविध विषंयांवर मार्गदर्शन होणार आहे.परीषदेत क्लिीनीकल लॅबोरेटरी अंतर्गत विषयांवरील मार्गदर्शन विविध अधुनीक तंत्रज्ञान,अधुनीक उपकरण, याबाबत तज्ञांमार्फत सविस्तर माहीती देण्यात येणार आहे. परीषदेत माहीती व चर्चासत्रानंतर असोशिएशनची वार्षीक सभा होणार असुन विविध विषयांवर साधक बाधक चर्चा होणार आहे.सर्वसाधारण सभेत जेष्ठ सभासद तथा माजी अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत .दोन दिवसीय परिषदेत ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे आयोजन असल्याने सर्व सभासदांनी मोठ्या संख्येंने उपस्थीत रहावे अशी विनंती असोशिएशनच्या अध्यक्ष चंद्रकांत पारखे यांनी केले आहे.