Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत -खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधासाठी 6 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी

 कर्जत -खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधासाठी 6 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी

संजय गायकवाड-कर्जत


 कर्जत-खालापूर तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021-22 अंतर्गत कर्जत व खालापूर तालुक्यात 6 कोटी 39 लक्ष रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

 

◆ खांडस येथील शिवमंदिर परिसर सुशोभिकरण करणे ता.कर्जत - (रु.50लक्ष).

◆ साजगाव पुरातन विठ्ठल मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, ता. खालापूर - (रु.50 लक्ष),

◆ कडाव गणपती मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, ता.कर्जत - (रु. 50 लक्ष),

 ◆ ग्रामपंचायत नेरळ येथील सुशोभिकरण करणे - (रु. 100 लक्ष),

 ◆ ग्रामपंचायत नेरळ गणेश घाट येथे आर.सी.सी संरक्षक भिंत बांधणे - (रु. 90 लक्ष),

 ◆ ग्रामपंचायत नेरळ येथे (माथेरान पायथ्याशी) असलेले हुतात्मा स्मारक सुशोभिकरण व दुरुस्ती करणे - (रु.20 लक्ष),

◆ भिवपुरी येथील अहिल्यादेवी होळकर तलावाकडून हुमगावकडे जाणारा रस्ता तयार करणे (रु.70 लक्ष)

◆ मौजे भिवपुरी (टाटा कॅम्प) येथील अहिल्याबाई होळकर तलाव परिसरातील रस्त्यांची सुधारणा करणे (रु. 62.60 लक्ष)

◆  मौजे गोळवाडी येथील पुरातन तलाव व अंबोट रस्त्याची सुधारणा करणे (रु.64.68 लक्ष)

◆ उंबरखिंड येथील शिवतीर्थ समरभूमी विकसित करणे (रु. 82.48)

  कर्जत व खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळ विकास कामांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल पर्यटन मंत्री मा. आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मा. आदीती तटकरे यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies